Loading...

Shibir Registration Form

|| सबका मालिक आत्मा ||

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट

संचालित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आयोजित आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर 2026

मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम सवयी आवश्यक आहेत आणि उत्तम सवयींसाठी उत्तम संस्कार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण आपल्या साठी घेऊन आले आहे आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर.

दि. 21 एप्रिल 2026 ते 11 मे 2026 या सुट्टीच्या काळात निवासी संस्कार शिबिराचे आयोजन आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल तर्फे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी-कोपरगाव रोड, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे करण्यात आले आहे.

परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशिर्वादातून आणि संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून संस्कार मूल्यांचा खजिना वय वर्षे ६ ते १५ किंवा इयत्ता पहिली ते आठवी या वयोगटातील मुला-मुलींसाठी खुला करण्यात आला आहे.

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषिक संपूर्ण भारतातील मुला-मुलींसाठी शिबिर प्रवेश उपलब्ध आहे. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामार्फत शिबिरार्थींना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

या निवासी बालसंस्कार शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. जसे की देशभरातील नामांकित मान्यवरांचे संस्कार व्याख्यान, बालचित्रपट महोत्सव, शिबिर व्याख्यान, बालकीर्तनकारांचे कीर्तन, आत्मा मालिक संत परिवार ध्यानयोग, बालसंस्कार मार्गदर्शन इत्यादी.

विद्यार्थ्यांचे कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, स्पर्धा परीक्षा या सर्वांगीण क्षेत्रामध्ये कौशल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य या संस्कार शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

|| सबका मालिक आत्मा ||

प्रवेश फी नियमावली

|| सबका मालिक आत्मा ||

बालसंस्कार शिबिराची प्रमुख उद्दिष्टे

आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराची मुख्य उद्दिष्टे मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्यावर उच्च मूल्ये आणि नैतिकता रुजवणे, आणि त्यांना सुजाण नागरिक बनवणे ही आहेत. हे शिबीर अध्यात्म, योग, कला आणि क्रीडा यांद्वारे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक क्षमतेत वाढ करण्याचे काम करते।

आध्यात्मिक व मानसिक विकास: मुलांना ध्यान, आत्मचिंतन आणि गुरूमंत्रा (अजापजाप) द्वारे मानसिक शांतता आणि आंतरिक शक्ती विकसित करण्यास मदत करणे।

मूल्यांची रुजवण: मुलांवर शिस्त, आदर आणि नैतिक मूल्ये रुजवून त्यांना एक चांगले आणि जबाबदार मानव बनवणे।

सर्वांगीण विकास (All-round Development): शारीरिक आरोग्यासाठी पोहणे (Swimming) आणि खेळांचा समावेश करून मुलांचा शारीरिक व मानसिक विकास करणे।

कला आणि कौशल्य विकास: संगीत, गायन, वादन आणि अभिनय यांसारख्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन स्व-अभिव्यक्ती (Self-expression) वाढवणे।

संभाषण कौशल्य व आत्मविश्वास: सार्वजनिक भाषणाचे (Public Speaking) प्रशिक्षण देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणे।

शैक्षणिक तयारी: मुलांची विचारशक्ती तीक्ष्ण करणे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे।

सांस्कृतिक जाणीव: भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणे।